महाराष्ट्र ग्रामीण

Ajit Pawar : शरद पवारांसमोर अजितदादा म्हणाले, देवेंद्रजी, सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा!

Ajit Pawar : मुद्दाम कुणाला नाहक त्रास देऊ नका. पण ज्यांनी चुका केला त्यांना त्रास झालाच पाहिजे, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar : सहकारात काही लोकं चुकीची कामं करतात, मग सत्तेत सहभागी होतात आणि चुकीच्या केलेल्या गोष्टीबाबत स्टे आणतात. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, अशा लोकांनी जरी प्रवेश केला तरी त्यांच्यावरची कारवाई सुरूच ठेवायची, म्हणजे हे लोक सुतासारखी सरळ होतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर केले आहे. दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ शतकोत्तर सुवर्णस्मृती दिन 150 व्या वर्षानिमित्त आयोजित “सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण” या विशेष परिसंवादात ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. दख्खनची उठाव झालेली शौर्य भूमी माझ्या मतदार संघातील आहे. सूपा परगणा माझ्या बारामती मतदारसंघात हा विभाग येतो. विद्याधर अनस्कार यांच कौतुक करायला हवं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनासकर प्रशासक, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी देखील अनासकर प्रशासक मधल्या काळात बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होती त्यावेळी शरद पवार साहेबांचा फोन आला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अनस्कार यांना प्रशासक करा. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे तह्यात ते प्रशासक राहतील, असं मला वाटत आहे.

सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा

अजित पवार पुढे म्हणाले की, आज सहकारामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अजूनही काही बदल झाले पाहिजेत, अशा प्रकारची अनेकांची भावना आहे.  इथे अनासकर यांनी सांगितलं की, संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला देखील त्या ठिकाणी काही मिळाले पाहिजे. त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील. पण, ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचे काम संचालक बोर्ड करते. त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी वसूल केलं पाहिजे. पण ते होत नाही. त्याला स्थगिती मिळते. मग संचालक बोर्ड सत्ता कोणाची आहे ते बघते आणि सहकार मंत्र्यांच्या पक्षाकडे ते जातात. हे कुठेतरी बंद झाले पाहिजे. माझे तर स्पष्ट मत आहे देवेंद्रजी… अशा पद्धतीने चुकीचे वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना थांबवलं पाहिजे. जरी प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ॲक्शन झालीच पाहिजे. मग हे लोक सगळी सुतासारखी सरळ होतील,

जो चांगलं काम करेल, त्याला त्रास देण्याचं काहीच कारण नाही

प्रत्येकाला वाटतं आपण तिकडे प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं, हे काही बरोबर नाही. मुद्दाम कुणाला नाहक त्रास देऊ नका. पण ज्यांनी चुका केला त्यांना त्रास झालाच पाहिजे. जो चांगलं काम करेल, त्याला त्रास देण्याचं काहीच कारण नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. आज सहकारात खूप मोठे बदल झाले आहेत. दुधापासून ते साखरेपर्यंत, पतसंस्था ते नागरी बँकांपर्यंत, बचत गटापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत सहकाराचे योगदान खूप मोठे आहे. आज राज्यामध्ये सव्वा दोन लाख संस्थांचे पाच कोटी 81 लाख सभासद आहेत. ही ताकद पुढे देखील वाढणार आहे. या संदर्भात स्वतः अमित शाह यांनी असे ठरवले आहे की, आपल्याला काहीही झाले तरी ही संख्या अजून मोठ्या प्रमाणावर वाढवायची आहे. त्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले असून तसे झाल्यानंतर खूप मोठे अमुलाग्र बदल आपल्याला राज्यात पाहायला मिळतील, असे अजित पवार म्हणाले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button