महाराष्ट्र ग्रामीण

 चिपळूण शहराची मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केली अधिकाऱ्यांसोबत पाहणीआमदार शेखर निकम यांनी

 चिपळूण शहराची मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केली अधिकाऱ्यांसोबत पाहणीआमदार शेखर निकम यांनी

 चिपळूण शहराची मान्सूनच्या पार्श्वभूमीवर केली अधिकाऱ्यांसोबत पाहणीआमदार शेखर निकम यांनी

चिपळूण शहर – २६ मे २०२५ : चिपळूण शहरातील नागरिकांना पावासाळ्यात विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातच कोकणात मान्सूनपुर्व पावसाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी ऐरिकेशन व बी. एन. सी. विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, नगरपालिका अधिकारी, एस. टी. अधिकारी यांच्यासह चिपळूण शहराची पाहणी केली.

चिपळूण शहरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. चिपळूण शहरात वाशिष्टी नदीला येणारा पूर व अतिवृष्टी यांमुळे शहर जलमय होते. आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यात शहरात वाशिष्टी नदीला येणारा पूर व अतिवृष्टी यांमुळे पाणी साचू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. आमदार शेखर निकम यांनी अधिकाऱ्यांसोबत चिपळूण शहरातील पॉवर हाऊस, प्रांत ऑफीस, चिपळूण बी.एस.एन.एल ऑफिस, चिपळूण जिप्सी कॉर्नर, पेठमाप नाईक ब्रीज, मुरादपूर गणपती मंदिर येथील पाणी निचरा पाहणी केली. बहादूरशेखनाका येथील वाशिष्टी नदीवरील जुना ब्रीज व गणपती विसर्जन घाट पाहणी, एन्रॉन ब्रीज दुरुस्ती पाहणी, चिपळूण एस. टी. आगार येथील आगाराची नवीन उभारण्यात येणारी इमारत व पाणी निचरा पाहणी, वांगडे मोहल्ला येथील एस. टी. निवारा शेड मारणे व पाणी निचरा यांची पाहणी केली. त्याचबरोबर खेंड महालक्ष्मीनगर व कांगणेवाडी (दुर्गाआळी) येथील दरड कोसळणे संबंधीत भागाची व कामाची पाहणी केली. आमदार शेखर निकम यांनी पाहणी केलेल्या सर्व संबंधीत ठिकाणांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

CHIPLUN NEWS MARATHI

मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून महिलांसाठी काम करते मी चिपळूण न्यूज संपादिका लोक निर्माण साप्ताहिक मध्ये रिपोर्टर म्हणून होते दैनिक न्यू सागर रिपोर्टर आहे

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button