India Pakistan Ceasefire News LIVE: भारत-पाकिस्तान दरम्यानच्या डीजीएमओ दरम्यान होणाऱ्या चर्चेची वेळ बदलली, पण पत्रकार परिषद ठरल्या वेळेतच होणार

India Pakistan Ceasefire News LIVE: शस्त्रसंधीवर भारत पाकिस्तानचे डीजीएमओ आज करणार चर्चा, शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
India Pakistan Ceasefire News LIVE: भारत-पाकिस्तान दरम्यानच्या डीजीएमओ दरम्यान होणाऱ्या चर्चेची वेळ बदलली, पण पत्रकार परिषद ठरल्या वेळेतच होणार
India Pakistan Ceasefire News LIVE: भारत-पाकिस्तान दरम्यानच्या डीजीएमओ दरम्यान होणाऱ्या चर्चेची वेळ बदलली. संध्याकाळी 6 वाजता चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तरीसुद्धा, दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
दुपारी 12 वाजता डीजीएमओची चर्चा होणार होती.
Navneet Rana Receives Death Threat From Pakistan: नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
Navneet Rana Receives Death Threat From Pakistan: नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी, खार पोलीस स्टेशनमध्ये नवनीत राणा यांच्याकडून तक्रार दाखल करत जवाब नोंदवला
“हमारे पास तुम्हारी पुरी जानकारी हें हिंदुशेरनी तु कुछ दिनो कि मेहमान तुझे खत्म कर देंगे ना सिंदूर बचेंगा ना सिंदूर लागाने वाली बचेंगी”.
या प्रकारचे कॉल पाकिस्तान मधून आल्याचं नवनीत राणा यांनी आपल्या जवाबात सांगितला आहे… नवनीत राणा त्यासोबतच रवी राणा यांच्या मोबाईलवर हे कॉल आले आहेत.
या सगळ्या प्रकरणी खार पोलीस स्टेशन तपास करत आहेत.
India Pakistan Ceasefire News LIVE: बुडत्याचा पाय खोलात… पाकिस्ताननं ओळखपत्र दाखवलेली ‘ती’ व्यक्ती दहशतवादीच
India Pakistan Ceasefire News LIVE: ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने मुरिदकेवर मारा केल्यावर लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्याच्या जनाजाला पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित होते. जनाजाला लष्करचा कमांडर हाफिज अब्दुल रौफ कलमा पढताना दिसला होता. मात्र पाकिस्तानने तो दहशतवादी नसून एक राजकीय नेता असल्याची बतावणी केली. भारताने पुरावा सादर केल्यावर पाकिस्तानने घाईघाईत एक फोटो आयडी आणि कागदपत्रं दाखवत तो नेता असल्याचं म्हटलंय. मात्र नेमकं इथेच पाकिस्तान अडकलं… पाकिस्तानने सादर केलेलं ओळखपत्र हे नेमकं अमेरिकेच्याही एका कुख्यात यादीत आहे. अमेरिकेने बंदी घातलेल्या एका दहशतवाद्याचं हे पाकिस्तानी नागरिकत्व सिद्ध करणारं ओळखपत्रं. आणि विशेष म्हणजे अमेरिकेच्या यादीतही या ओळखपत्राचा धनी आहे कुख्यात दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ. हे सगळं लक्षात घेता पाकिस्तान किती जोरात तोंडावर आपटलाय हे लक्षात येईल.