रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय
♦♦रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय
चिपळूण शहराला देखील मुसवळधार पावसाचा तडाखा बसलाय मागील काही तासांपासून सुरू असणारा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे परशुराम घाटात तर पावसाने कहर केलाय घाटातील पाणी थेट रस्त्यावरती येत आहे चिखल माती मोठ्या प्रमाणात हायवे वरती येत आहे यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय रस्ता रुंदीकरणाचे काम परशुराम घाटामध्ये चालू आहे तर विविध स्वरूपाची घाटातील उपाय योजनेचे काम देखील चालू आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे हे काम सध्या ठप्प झालेला आपल्याला पाहायला मिळते पावसाचा जोर असाच कायम राहिला तर मात्र परशुराम घाटामध्ये अजूनही परिस्थितीत धोकादायक निर्माण होऊ शकते कारण संरक्षण भिंतीच्या बाजूला उभारण्यात आलेली दुसरी भिंत आणि त्याखाली टाकलेला भराव देखील सध्या पावसाच्या पाण्याबरोबर वाहून चालला आहे
सध्या आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध टीम चिपळूण मध्ये सतर्क आहेत