ररत्नागिरी समुद्रात फिरण्यासाठी गेलेले चार जण बुडून मृत्यू
आरेवरे समुद्रात फिरण्यासाठी गेलेले चार जण बुडून मृत्यू* रत्नागिरी तालुक्यातील आरेवरे येथील
*आरेवरे समुद्रात फिरण्यासाठी गेलेले चार जण बुडून मृत्यू*
रत्नागिरी तालुक्यातील आरेवरे येथील समुद्र किनारी फिरण्यासाठी गेलेल्या ठाणे मुंब्रा येथील 4 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6.30 वा घडली.यात तीन महिला आणि एक पुरुषाचा समावेश आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे मुंब्रा येथून उज्मा शामशुद्दीन शेख (18) उमेरा शामशुद्दीन शेख (29) या रत्नागिरीत आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या.शनिवारी सायंकाळी त्या दोघी जैनब जुनैद काझी (26),जुनैद बशीर काझी(30), दोन्ही रा. ओसवाल नगर, रत्नागिरी ) हे चौघे सायंकाळी 5 वा. सुमारास आरेवारे येथे फिरण्यासाठी गेले होते.समुद्र खवळलेला होता. त्यातच दुपार पासून पावसाला सुरुवात झाली होती. या चौघाना पाण्यात खेळण्याचा मोह आवरला नाही.उसळी घेणाऱ्या लाटांचा अंदाज त्यांना आला नाही. अचानक उसळलेल्या महाकाय लटांनी हे चौघेही पाण्यात ओढले गेले.जीव वाचवण्यासाठी त्यांचा आकांत सुरु झाला.काही वेळ एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले काही प्रत्यक्षदर्शिनी आरडा ओरडा सुरु केला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांनी बुडालेल्याना वाचवण्याचा प्रयत्न केला.पण त्याचेही प्रयत्न असफल ठरले. सायंकाळी 7 वा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलिसांनी आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य सुरू असताना.बुडालेल्या चौघांचे मृतदेह हाती लागले आहेत. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.